
॥ श्री गणेशाय नमः ॥
‘ज्योतिष विशारद’ यांच्याकडून पारंपरिक वैदिक ज्योतिषाच्या आधारे आधुनिक जीवनातील विविध आव्हानांचे शास्त्रशुद्ध विश्लेषण व मार्गदर्शन. करिअर, व्यवसाय, नोकरीतील बदल, विवाह व कौटुंबिक निर्णय यांसह आजच्या AI, डेटा अॅनालिटिक्स, IT आणि कॉर्पोरेट क्षेत्रातील बदलत्या संधी व आव्हानांबाबत ज्योतिषशास्त्रीय मार्गदर्शन.
सेवा
जन्मपत्रिकेच्या अभ्यासातून शास्त्रशुद्ध विश्लेषण करून योग्य मार्गदर्शन.
गुणमेलन, ग्रहयोग व दोषांचे परीक्षण करून अनुकूल विवाह निर्णयासाठी सविस्तर मार्गदर्शन.
शिक्षण, नोकरी, करिअरमधील बदल, व्यवसाय तसेच IT, AI, डेटा अॅनालिटिक्स आणि कॉर्पोरेट क्षेत्रातील बदलत्या संधी व आव्हानांसाठी ग्रहस्थितीच्या आधारे विश्लेषण व मार्गदर्शन.
ज्योतिष विशारद
बँकिंग क्षेत्रातील प्रदीर्घ कारकिर्दीनंतर श्री. सुरेश म. दीक्षित यांनी आपल्या दीर्घकालीन आवडीच्या वैदिक ज्योतिषशास्त्राच्या अभ्यासाकडे आणि ज्योतिष मार्गदर्शनाकडे अधिक लक्ष केंद्रित केले.
ज्योतिषशास्त्राचा अभ्यास करताना त्यांनी अनुभवी अभ्यासकांचे मार्गदर्शन घेतले असून, सातारा येथील 'संजीवनी ज्योतिष कार्यालय' येथून 'ज्योतिष विशारद' ही पदवी प्राप्त केली आहे.
पारंपरिक वैदिक ज्योतिषाच्या आधारे आजच्या जीवनातील विविध प्रश्नांचा अभ्यास करून व्यावहारिक मार्गदर्शन देण्यावर त्यांचा भर आहे.
शिक्षण, नोकरी, करिअरमधील बदल, व्यवसाय आणि विवाहविषयक प्रश्नांसोबतच IT, डेटा अॅनालिटिक्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, बँकिंग आणि कॉर्पोरेट क्षेत्रातील बदलत्या स्वरूपाच्या करिअरविषयक प्रश्नांवरही ते ज्योतिषशास्त्राच्या आधारे मार्गदर्शन करतात.
संपर्क
पत्रिका निर्मिती व ज्योतिष मार्गदर्शनासाठी आमच्याशी संपर्क साधा. सविस्तर अभ्यासासाठी जन्मतारीख, जन्मवेळ आणि जन्मस्थळाची अचूक माहिती कृपया उपलब्ध करून द्या.
प्रक्रिया
तुमची जन्मतारीख, जन्मवेळ, जन्मस्थळ आणि प्रश्न ई-मेल किंवा WhatsApp द्वारे पाठवा. त्यानंतर चर्चेसाठी सोयीची वेळ निश्चित केली जाईल.
चर्चेपूर्वी श्री. दीक्षित तुमची जन्मपत्रिका, ग्रहस्थिती आणि विचारलेल्या प्रश्नाच्या अनुषंगाने संबंधित ज्योतिषीय बाबींचा अभ्यास करतात.
ननिश्चित वेळेनुसार फोन किंवा ऑनलाइन व्हिडिओ कॉलद्वारे चर्चा केली जाते. जन्मपत्रिकेच्या अभ्यासाच्या आधारे तुमच्या प्रश्नांवर मार्गदर्शन केले जाते.
₹२०१/-